वाजारवाडी ते लंडनचा प्रवास
वंजारवाडीचा शरद तांदळे
चमचमत्या सोन्याचा मुलामा असलेलं सर्वार्थाने भव्यदिव्य छत, जगावर राज्य केल्याची साक्ष सांगणा-या त्या तितक्याच ऐटदार भिंती, उमरावी बाज असणारा पायाखालचा तो लाल गालिचा आणि सभागृहात शाही पाहुण्यांची गर्दी... मंचावर कार्यक्रम सुरू होऊन थोड्याच वेळात नाव पुकारण्यात आलं YBI Young Entrepreneur of the Year Award 2013 इज गोज टू मिस्टर शरद तांदले. आणि बीड जिल्ह्यातील, हजार वस्ती असलेल्या नि डोंगराने वेढलेल्या, वंजारवाडी या छोट्याशा गावचा ३२ वर्षीय शरद तो आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर जेव्हा जायला निघाला, त्या वेळी त्या सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. प्रत्येकाची नजर त्याच्यावर खिळून होती. प्रत्येकाच्याच नजरेत या तरुणाबद्दल कौतुकाचा भाव स्पष्ट जाणवत होता. हे ठिकाण होतं, बकिंगहॅम पॅलेस, लंडन आणि या विशेष पुरस्कार सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती होती, ती प्रिन्स चार्ल्स यांची.
शरद उत्तमराव तांदळे याचा आतापर्यंतचा प्रवास हा एका अशा तरुणाचा प्रवास आहे की, ज्याने जीवनात केवळ अपयश, अपयश आणि अपयशच पाहिलं होतं. मात्र थांबायचं नाही, खचायचं नाही, तर लढायचं आणि फक्त लढायचं, हा एवढाच काय तो विचार त्याच्या डोक्यात होता.
औरंगाबाद येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी शरदने प्रवेश घेतला. पहिलं वर्ष आपण भले आणि आपला अभ्यास भला, या न्यायाने संपलं. मात्र स्वभावात जिज्ञासा आणि अन्यायाविरोधातील चीड असल्यामुळे जगातल्या ब-यावाईट घटनांवर त्याचं लक्षही असायचं. एकीकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर दुसरीकडे हे सामाजिक प्रश्नाचं जग, अशा दोन पातळ्यांवर त्याचं द्वंद्व सुरू झालं. याच काळात त्यानं ‘विजयी युवक’ या नावानं एक मासिकसुद्धा सुरू केलं. सुरुवातीला ब-यापैकी व्यावसायिक यश या मासिकाच्या वाट्याला आलं. मात्र सगळा पैसा याला त्याला मदत करण्यात संपू लागला. याच काळात शरद विद्यार्थी चळवळीत ओढला गेला. विद्यार्थ्यांचे कित्येक प्रश्न त्याने सोडवले. अल्पावधीत तो विद्यार्थ्यांचा ‘शरदभाऊ’ झाला. मात्र वडिलांचा या सा-याला स्पष्ट विरोध होता. शरदने इंजिनिअर व्हावे, एवढीच त्यांची इच्छा होती.

मात्र, विद्यार्थी आणि त्यांच्या प्रश्नांमध्ये दिवस-रात्र राहणारा शरद काहीतरी वेगळं करू इच्छित होता. याच दरम्यान शेवटच्या वर्षी एका पेपरमध्ये तो नापास झाला आणि वडिलांच्या रोषाला त्याला सामोरं जावं लागलं. पुढे इंजिनिअरिंग पूर्ण केलं. मधल्या कालावधीत बरंच कर्ज डोक्यावर झालं होतं. घरून पैसे मागू शकत नव्हता. आता रोजीरोटीचा प्रश्न महत्त्वाचा होता. वडिलांच्या आग्रहामुळं त्याने पुण्याला जायचा निर्णय घेतला. जाताच, चार हजार रुपयांचा जॉब मिळाला. एक दिवस कंपनीच्या बाहेर एकेकाळी पुढं पुढं करणारा मुलगा भेटला.
‘हाय हॅलो’ झाल्यावर तो समोरच्या कंपनीत १५ हजार रुपयांवर काम करतो, ही माहिती मिळाली. अजून अस्वस्थ वाटू लागलं. मग हैदराबादला सॅप कोर्स करायचं ठरलं. वडिलांचा विश्वास उडाल्यामुळं कोर्सची फी मागण्याची हिंमत नव्हती. मग आईने गुपचूप स्वतःचं सोनं गहाण ठेवलं आणि पैसे घेऊन शरद औरंगाबादला आला. रात्री मित्राकडे थांबला. सकाळी उठून पाहतो तर खिळ्याला लटकवलेली त्याची पँटच गायब होती. काही वेळात लक्षात आलं, चोरी झालीय. खिशातले जमा केलेले जवळपास ७० हजार रुपये चोरीला गेले होते. हातपाय गळले. रात्री रेल्वेने हैदराबादला जायचं होतं.

दिवसभर मग मित्रांनी १८ हजार गोळा केले. हैदराबादला आल्यावर सहा महिने खाण्यापिण्याचे खूप हाल सोसले. कित्येकदा उपाशीच झोपला. पैसे वाचावे म्हणून चहा बंद, बाहेरचं जेवण बंद, असं करत शरदने टॉप केलं. परत पुण्याला आला. मात्र अनेक कारणांमुळं जॉब मिळत नव्हता. जवळचे सगळे पैसे संपलेले. तीन-तीन दिवस उपाशी राहण्याचे प्रसंग कित्येकदा घडत होते. मध्यंतरी वडिलांनी दिलेले १० हजार रुपयेही संपले. अपयशाच्या भावनेने गावी तोंड दाखवायची इच्छा नव्हती. यात एक दिवस एक जुना इंजिनिअर मित्र भेटला आणि त्याने धनकवडीमधील ट्रान्सफॉर्मर बसवून देतो का, असं विचारलं. शरदने चॅलेंज स्वीकारलं. कुठलंही पूर्वज्ञान नसताना हे काम यशस्वी करून दाखवलं. या कामाचे त्याला चार हजार रुपये मिळाले. त्यानंतर एकामागं एक अंडरग्राउंड केबल टाकण्यापासून पाइपलाइनची कामं मिळत गेली. हळूहळू मनमिळाऊ स्वभावामुळे जनसंपर्क वाढत गेला. यातच मोठ्या संघर्षाने शरदने पुणे महानगरपालिकेतून काँट्रॅक्टर म्हणून लायसन्स मिळवलं. मग स्वतःच लहान लहान टेंडर भरणं सुरू केलं. एकदा एका ५० लाख रु.च्या टेंडरवेळी त्याला घरात घुसून जिवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. या व अशा कित्येक प्रसंगांना तोंड देत त्याने त्याचा प्रवास चालूच ठेवला.
पुढे तीनच वर्षांत शरदने १७५ कुटुंबांना रोजगार मिळवून दिला. पीडब्ल्यूडी, एमजेपी, झेडपी, एमएसईबी, एमईएस, जलसंपदा अशा सगळ्या ठिकाणी आज तो अधिकृत काँट्रॅक्टर म्हणून काम करतोय. तीन वर्षांआधी त्याने स्थापलेल्या ‘इनोव्हेशन इंजिनिअर्स अँड काँट्रॅक्टर्स’ या कंपनीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. पहिला मोठा चेक हातात पडल्या पडल्या शरदने गावाकडे आपल्या वडिलांना चारचाकी भेट म्हणून पाठवून दिली. या संघर्षाची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. आजघडीला विविध ठिकाणी मार्गदर्शनासाठी त्याला बोलावण्यात येतं. आज त्याने २५पेक्षा अधिकांना उद्योजक बनवलंय. त्याच्या सगळ्या यशाचं श्रेय तो त्याच्याकडे असणा-या कामगारांना आणि त्या प्रत्येक व्यक्तीला देतो, ज्याने त्याला संघर्षात मदत केली. गेल्या वर्षी प्रिन्स चार्ल्स पुण्याला आले होते. या वेळी डिनरसाठी शरदला थेट लंडनहून निमंत्रण होतं. या प्रसंगी शरदसोबत राहुल बजाज व अन्य दिग्गजांची उपस्थिती होती.
या ठिकाणी एक मेक्सिकन म्हण उद्धृत करावीशी वाटत आहे, “ त्यांनी आम्हाला गाडलं पण ते विसरलेच, की आम्ही बिया होतो.” शरदसुद्धा एक अशी बी आहे, की जिला जेवढं गाडाल, तेवढी ती उगवून बाहेर येणारच...

Share
No comments:
Post a Comment